T20 World Cup 2024: उपांत्य फेरीच्या लढतींसाठी आयसीसीचा मोठा निर्णय, भारत इंग्लंड मॅचबद्दल अपडेट समोर
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 च्या सर्व लढती संपल्या आहेत. अखेरच्या लढतीत अफगाणिस्ताननं बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपांत्य फेरीत चार संघ पोहोचले असून त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील मॅच भारतीय प्रमाण वेळेनुसार 27 जूनला पहाटे 6 वाजता सुरु होणार आहे. ही मॅच त्रिनिदादमध्ये होणार आहे.
आयसीसीनं दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील मॅचसाठी रिचर्ड एलिंगवर्थ आणि नितिन मेनन यांची निवड ऑन फिल्ड अम्पायर म्हणून केली आहे. रिचर्ड केटलबरो टीव्ही अम्पायर असतील. तर एहसान राजा चौथे पंच असतील. मॅच रेफरी रिची रिचर्डसन असतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी उपांत्य फेरीची लढत भारतीय प्रमाण वेळेनुसार 27 जूनला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. भारताची मॅच गयानामध्ये होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीत ऑन फिल्ड अम्पायर रॉड टकर आणि क्रिस गैफनी हे असतील. टीव्ही अम्पायर जोएल विल्सन असीतल. तर चौथे पंच म्हणून पॉल रिफेल जबाबदारी पार पाडतील. मॅच रेफरी जेफ क्रो असतील.