Phil Salt : 4,6,4,6,6,4 फिल सॉल्टचं सेंट लूसियात वादळ, रोमॅरिओ शेफर्डच्या ओव्हरमध्ये चौकार षटकारांचा पाऊस...
युवराज जाधव
Updated at:
20 Jun 2024 02:37 PM (IST)
1
इंग्लंडचा सलामीवीर फिलीप सॉल्टनं 47 बॉलमध्ये 87 धावा करुन वेस्ट इंडिजला पराभूत केलं. इंग्लंडनं 8 विकेटनं वेस्ट इंडिजवर विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सॉल्टनं 87 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं पहिल्यांदा जोस बटलर सोबत 67 धावांची भागिदारी केली. यानंतर जॉनी बेयरस्टोसोबत 97 धावांची भागिदारी केली आहे.
3
सॉल्टनं 87 धावांच्या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 7 चौकार मारले. फिल सॉल्टनं वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रोमॅरिओ शेफर्ड वर हल्लाबोल केला.
4
रोमॅरिओ शेफर्ड 16 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या ओव्हरमध्ये फिल सॉल्टनं 4,6,4,6,6,4 अशा एकूण 30 धावा काढल्या.
5
फिल सॉल्टच्या फलंदाजीमुळं वेस्ट इंडिजला यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिला पराभव स्वीकारावा लागला.