IND vs AFG : कुलदीप यादवची संघात एंट्री होण्याची दाट शक्यता, टीम इंडियातून कोण बाहेर जाणार? रोहित शर्माच्या निर्णयाकडे लक्ष
भारत आज सुपर 8 मध्ये राशिद खानच्या नेतृत्त्वातील अफगाणिस्तान विरुद्ध लढणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मॅच बाराबाडोसच्या केंसिंग्टन ओवलमध्ये होणार आहे. रोहित शर्मा बेस्ट टीमसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूयॉर्कमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदेशीर खेळपट्टी असल्यानं तिथं रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली होती. तिथं अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळत होते.
टीम इंडियात कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिजमध्ये कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.
वेस्ट इंडिजमध्ये सुपर 8 च्या सर्व लढती होणार आहेत. रोहित शर्मा त्यामुळं फिरकी गोलंदाजी मजबूत करण्यावर भर देईल. कुलदीप यादवला संघात संधी मिळू शकते.
टीम इंडियात मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. कुलदीप यादवला संधी मिळाल्यास फिरकी गोलंदाजी भक्कम होईल. युजवेंद्र चहलला देखील अजून स्थान मिळालेलं नाही.