T20 World Cup 2024 : ग्रुप स्टेजमध्ये धमाकेदार कामगिरीनंचार संघ अजिंक्य राहिले, भारतासह वेस्ट इंडिजची खरी परीक्षा सुरु होणार
भारतानं अ गटात तीन मॅच जिंकल्या तर भारताची कॅनडा विरुद्धची मॅच पावसानं रद्द झाली. भारातच्या नावावर अ गटात 7 गुण होते. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजला ग्रुप स्टेजमध्ये एकही पराभव स्वीकारावा लागलेला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली होती. दक्षिण आफ्रिकेनं ड गटात सर्व सामने जिंकले.नेपाळचा त्यांनी अटीतटीच्या लढतीत 1 रननं पराभव केला.
ऑस्ट्रेलियानं देखील ब गटात सर्व सामने जिंकले. ब गटातून सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं सुपर 8 मध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत केल्यानं इंग्लंडला सुपर 8 ची दारं उघडली आहेत. .
वेस्ट इंडिजनं देखील ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहेत. आज झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानला वेस्ट इंडीजनं 100 पेक्षा अधिक धावांनी पराभूत केलं.
वेस्ट इंडिजसह क गटातून अफगाणिस्ताननं देखील सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. मात्र, अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताविरुद्ध ते 20 जूनला लढणार आहेत.