IND vs SA : चक दे इंडिया! रोहितसेनेनं इतिहास रचला, भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला
क्लासेनच्या फटकेबाजीमुळे एकेवेळी सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने 24 चेंडूंत 36 धावा असा झुकला होता. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंड्याने क्लासेनचा 6 काटा दूर केला आणि दबावाच्या क्षणी सूत्र भारताच्या हाती आणून दिली. मग अखेरच्या षटकात सहा चेंडू 16 धावा असं समीकरण होतं. (Image Source : PTI)
तेव्हा सूर्यकुमारने बाऊंड्रीवर अफलातून कॅच घेत मिलरला तंबूत परतवलं. पुन्हा एकदा हार्दिक पंड्यानेच विकेट काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. (Image Source : PTI)
त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकांत सात बाद 176 अशी मजल मारली. (Image Source : PTI)
स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत शांत राहिलेल्या विराटच्या बॅटने पाणी दाखवलं आणि 59 चेंडूंत 76 धावांची खेळी केली. (Image Source : PTI)
विराटच्या या खेळीत सहा चौकार, दोन षटकारांचा समावेश होता. (Image Source : PTI)
अक्षर पटेलने 31 चेंडूंत एक चौकार, चार षटकारांसह 47 आणि शिवम दुबेने 16 चेंडूंत तीन चौकार, एक षटकारासह 27 धावा करत संघाला 176 चा टप्पा गाठून दिला.(Image Source : PTI)
महेंद्रसिंग धोनीने 2007 मध्ये जिंकलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर तब्बल 17 वर्षांनी भारताने टी-ट्वेन्टी विश्वचषकाला गवसणी घातली.(Image Source : PTI)
शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांच्या आशा डेव्हिड मिलरने. पण पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने जवळपास षटकार ठोकला.(Image Source : PTI)
भारतीय चाहत्यांचा श्वास रोखला गेला, पण सूर्यकुमार यादवने आश्चर्यकारक झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज शेवटच्या 5 चेंडूंवर 8 धावा जोडू शकले, त्यामुळे टीम इंडियाने 9 धावांनी विजय मिळवला.(Image Source : PTI)
डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवला. (Image Source : PTI)