AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाला धडा शिकवला, अफगाणिस्ताननं घेतला वर्षाच्या आत पराभवाचा बदला, देशभरात जोरदार जल्लोष

टी 20 वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर राशिद खानच्या नेतृत्त्वातील टीमनं जल्लोष केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अफगाणिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनी देखील या विजयाचं सेलीब्रेशन केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं चाहते रस्त्यावर उतरले असल्याचं पाहायला मिळालं.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या विजयानंतरच्या देशभरातील सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अफगाणिस्तानमधील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येनं रस्त्यावर जमल्याचं पाहायला मिळालं.
अफगाणिस्ताननं रहमानुल्लाह गुरबाझच्या 60 धावांच्या आणि इब्राहिम जरदान याच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर 148 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल वगळता इतरांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल 59 धावा करुन बाद झाल्यानंतर आस्ट्रेलियाचा डाव गडगडला. अफगाणिस्ताननं वनडे वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढल्यान चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.