PPF खात्यातून मुदतीआधी पैसे कसे काढायचे? नियम काय आहेत? सोप्या भाषेत समजून घ्या...
PPF Rules: पब्लिक प्रॉविडेंट फंड (Public Provident Fund) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी सर्वाधिक प्रसिद्ध अशी स्मॉल सेव्हिंग योजना आहे. दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना या योजनेत चांगला परतावा मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनेत जमा केलेल्या गुंतवणुकीवर सरकार सध्या 7.10 टक्क्यांनी व्याज देत आहे. विशेष म्हणजे चक्रवाढ व्याजाचाही या योजनेत फायदा होतो. तुमचे खाते मॅच्यूअर झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुतंवलेली तसेच तुम्हाला मिळालेले व्याज दिले जाते.
मात्र, आपत्कालीन स्थितीत गुंतवणूकदारांना पैशांची गरज भासते. अशा स्थितीत गुंतवणूकदार त्यांच्या पीपीएफ खात्यातून काही पैसे काढू शकतात. पण त्यासाठी काही नियम आहेत.
पीपीएफ खात्यातून तुम्हाला प्रिमॅच्यूअर पैसे काढायचे असतील तर तुमच्या खात्याला सुरु होऊन पाच वर्षे झालेली असणे गरजेचे आहे.
प्रिमॅच्यूअर विदड्रॉल करायचे असेल तर तुम्हाला जमा रकमेपैकी जास्तीत जास्त 50 टक्केच रक्कम मिळू शकते.
पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमच्या परताव्यावर प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम 80सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट मिळते.