T20 World Cup 2022: मोहम्मद शामीसह भारताचे 'हे' तीन स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा?
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या 35 वर्षांचा आहे. त्याचं वय लक्षात घेता तो आगामी टी-20 विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडच्या काळात रोहित शर्माच्या फिटनेसची नेहमीच समस्या राहिली आहे. रोहित शर्मानं भारतीय संघासाठी आतापर्यंत 142 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं 3 हजार 737 धावा केल्या आहेत.
आशिया चषक 2022 नंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतलाय. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 71वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. विराट कोहलीची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
विराट कोहली 35 वर्षांचा झाला आहे. मात्र, त्याचा फिटनेस चांगला आहे. पण तरीही तो 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 क्रिकेटला अलविदा करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. विराट कोहलीला 2014 आणि 2016 मध्ये 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरविण्यात आलं आहे.
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या राखीव खेळाडू म्हणून टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय. दरम्यान, 32 वर्षीय मोहम्मद शामी गेल्या अनेक महिन्यांपासून भारताच्या टी-20 संघाचा भाग नाही.
अशा परिस्थितीत तो 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. यावेळी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघानं वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामनेही खेळले आहेत. यातील एक सामना भारतानं जिंकलाय. तर, दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारलाय. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकानंतर मोहम्मद शामीनं भारतीय संघाचे तीन स्टार क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे.