PHOTO: एखाद्याच्या मृत्यूनंतर मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार आणि पासपोर्टचे काय करायचे?
सहसा, कोणत्याही प्रकारचे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील काम हाताळण्यासाठी, आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : गुगल)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कागदपत्रांचे काय करावे, याचा विचार कधी केला आहे का?(फोटो सौजन्य : गुगल)
आधार कार्ड युनिव्हर्सल आयडी मानले जाते. एखाद्याच्या मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या आधारचा गैरवापर टाळण्यासाठी, ते UIDAI वेबसाइटद्वारे लॉक केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य : गुगल)
तसेच, ती व्यक्ती मृत्यूपूर्वी आधारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा किंवा अनुदानाचा लाभ घेत असेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती संबंधित विभागाला द्यावी. जेणेकरून त्याचे नाव योजनेतून वगळले जाईल.(फोटो सौजन्य : गुगल)
मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर केले जाऊ शकते. यासाठी मृताच्या कुटुंबीयांना आयकर विभागाकडे जावे लागेल.(फोटो सौजन्य : गुगल)
सरेंडर करण्यापूर्वी, मृत व्यक्तीची सर्व खाती दुसर्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित किंवा बंद करावीत. जेणेकरून नंतर या कामात कोणतीही अडचण येणार नाही.(फोटो सौजन्य : गुगल)
तुम्हाला व्होटर आयडीद्वारे मतदान करण्याची संधी मिळते. पण एखाद्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याचे मतदार ओळखपत्र रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-7 भरावा लागेल, त्यानंतर हे कार्ड रद्द केले जाईल. मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.(फोटो सौजन्य : गुगल)
आधार कार्डप्रमाणे पासपोर्ट रद्द करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. कालबाह्यता तारखेनंतर ते आपोआप अवैध होते. अशा परिस्थितीत पासपोर्टची कालमर्यादा संपेपर्यंत सोबत ठेवा, जेणेकरून तो चुकीच्या हातात पडू नये.(फोटो सौजन्य : गुगल)