Wisden T20 Cricketer of the Year : सुर्यकुमार यादवच्या नावे आणखी एक विक्रम, ठरला विस्डन क्रिकेटर ऑप द इयर
भारतीय क्रिकेटपटू सुर्यकुमार यादव जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाज म्हणून मान (World's The Best T20 Batter Currently in World Cricket) मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविस्डेन क्रिकेटर्स अल्मानॅक 2023 (Wisden Cricketers Almanack) च्या यादीमध्ये सूर्यकुमार यादवला वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटर (Wisden T20 Cricketer of the Year ) म्हणून निवडण्यात आलं आहे.
सुर्यकुमारने 2022 मध्ये भारतीय फलंदाजाने सुमारे 180 च्या स्ट्राइक-रेटने 1431 धावा केल्या, यामध्ये त्याने 10 अर्धशतके आणि तीन शतके अशी चमकदार खेळी केली. यामुळे गेल्या वर्षी टीम इंडिया 40 पैकी 28 सामने जिंकणारा सर्वात यशस्वी संघ ठरला.
याच कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला विस्डेन अल्मनॅकचा T20 आंतरराष्ट्रीय (T20I) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
सूर्यकुमारच्या बॅटने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे तो आता जगभरातील टी20 क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
सुर्यकुमारने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पण केलं. या सामन्यात त्याने 28 चेंडूत अर्धशतक झळकावून शानदार खेळी केली.
सूर्यकुमार यादवला विस्डेन T20I क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष म्हणून निवडण्यात आलं. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने गेल्या वर्षभरात त्याच्या अप्रतिम कामगिरीसाठी हा मान मिळाला आहे.
2022 मध्ये, सुर्यकुमारने एका वर्षात 1000 टी20 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.
त्याने नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध आणि माउंट मौनगानुई येथे न्यूझीलंडविरुद्ध दोन शतके ठोकली. त्याने या सर्व धावा 187.43 च्या स्ट्राइक रेटने केल्या आणि मधल्या फळीत फलंदाजी करताना हे त्याची ही खेळी अतुलनीय आहे. त्यामुळे त्याला हा सन्मान देण्यात आला आहे.