RCB vs CSK IPL 2023 : चेन्नईकडून बंगळुरुचा पराभव, शेवटच्या षटकात आठ धावांनी विजय
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ही रोमांचक लढत पाहायला मिळाली. यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलंच धुतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नई संघाने सहा गडी गमावून 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं.
मात्र आरसीबी 20 षटकात 219 धावाच करु शकला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर चेन्नईने बंगळुरु विरुद्धचा सामना आठ धावांनी जिंकला.
चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
पहिल्यांदा फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 226 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ निर्धारित षटकांत फक्त 218 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात चेन्नईने आरसीबीवर आठ धावांनी विजय मिळवला.
गळुरूसाठी झालेल्या या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने 33 चेंडूत 62 धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूत 76 धावा केल्या, मात्र दोघांनाही आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पराभूत करू शकला नाही.
चेन्नई संघासाठी डेव्हन कॉनवेने 83 धावा केल्या. शिवम दुबेनेही 27 चेंडूत 52 धावा केल्या.
बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसीने 62 आणि ग्लेन मॅक्सवेलने 76 धावा केल्या. या दोघांमधील 126 धावांची भागीदारीही बंगळुरूला विजय मिळवून देऊ शकली नाही.
पहिल्याच षटकात चेन्नईचा प्रभावशाली खेळाडू आकाश सिंगने आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याने विराट कोहलीला चार धावांवर क्लीन बोल्ड केलं. कोहलीच्या पाठोपाठ महिपाल लोमरोर शून्य धावांसह तंबूत परतला. दुसऱ्याच षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीचा बळी ठरला.
शेवटच्या षटकात सुयश प्रभुदेसाईने 11 चेंडूत 19 धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईकडून तुषार देशपांडेने तीन आणि मथिशा पाथिरानाने दोन गडी बाद केले. आकाश सिंह, महिष तेक्षाना आणि मोईन अली यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.