Virat and Rohit : दिग्गज भारतीय क्रिकेटर विराट-रोहितची टी20 कारकिर्द संपली? सुनील गावस्कर म्हणतात...
Team India : न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नाहीत, ज्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे.

Rohit and Virat
1/10
भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टी20 कारकिर्द संपली अशी चर्चा होताना दिसत आहे.
2/10
मागील काही टी-20 मालिकेसाठी दोघेही टीम इंडियाचा भाग नसल्याचं दिसून आल्यामुळे या चर्चा होत आहेत.
3/10
या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दोघे नव्हते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतही टीम इंडियामध्ये विराट-रोहित बाहेर आहेत.
4/10
अशा परिस्थितीत विराट आणि रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द इथेच संपली आहे का? तसंच विश्वचषक 2024 मध्ये ते संघात असतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
5/10
यानंतर माजी क्रिकटर सुनील गावसकर यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहू असे काहीसे उत्तर दिले.
6/10
सुनील गावसकर म्हणाले, 'मी ज्या पद्धतीने या निर्णयाकडे पाहत आहे, त्यावरून असं दिसतं की पुढील वर्षी टी-20 विश्वचषक होणार आहे आणि नवीन निवड समितीला यावेळी अधिकाधिक तरुणांना संधी द्यायची आहे. मात्र, याचा अर्थ रोहित किंवा कोहलीच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असा अजिबात नाही.''
7/10
तसंच गावस्कर म्हणाले या दोघांनी 2023 मध्येही चांगली कामगिरी सुरू ठेवल्यास 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्यांचा समावेश नक्कीच केला जाऊ शकतो.
8/10
तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळवली जाणार असल्याने निवडकर्त्यांनी त्यांना विश्रांती दिली असावी जेणेकरून ते या महत्त्वपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करु शकतील. असंही ते म्हणाले
9/10
या सर्व समोर येणाऱ्या बातम्यांतून नेमकं काही स्पष्ट होत नसल्याने रोहित आणि विराट पुन्हा टी20 संघात कधी येणार? हा प्रश्न कायम आहे.
10/10
तसंच टीम इंडियाकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळेच विराट आणि रोहितसारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतरही टीम इंडिया विरोधी संघापेक्षा मजबूत दिसत आहे.
Published at : 17 Jan 2023 06:16 PM (IST)