Smriti Mandhana : स्मृती मंधानाचे शिक्षण कुठे अन् किती झाले? जाणून घ्या
स्मृती मंधानाने आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ऑस्ट्रेलियाविरोधात झळकावलं आहे. 2016 मध्ये आयीसीसीच्या महिला संघात स्मृती ही एकमेव भारतीय खेळाडू होती. (instagram/smriti_mandhana/)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार स्मृती मंधाना नेहमीचं चर्चेत असते. ती भारतीय संघाची सलामी फलंदाज आहे.. स्मृती मंधानाला नॅशनल क्रशही म्हटले जाते.. स्मृतीचे अनेक चाहते आहेत. तिचं शिक्षण काय झालेय? याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात... (instagram/smriti_mandhana/)
स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईतील मारवाडी कुटुंबात झाला. ती दोन वर्षाची असताना कुटुंबीय माधवनगर सांगलीला शिफ्ट झालं होतं. (instagram/smriti_mandhana/)
स्मृती मंधाना हिने आपलं शालेय शिक्षण सांगलीतूनच केलेय. त्याशिवाय पदवीचं शिक्षणही सांगलीच्या चिंतामनराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पूर्ण केलेय. (instagram/smriti_mandhana/)
स्मृतीने आंतरराष्ट्रीय कसोटीत 13 ऑगस्ट 2014 रोजी पदार्पण केले होते. तर वनडेमध्ये 10 एप्रिल 2013 रोजी बांग्लादेशविरोधात पदार्पण केलेय. स्मृतीने 5 एप्रिल 2013 रोजी टी20 मध्ये पदार्पण केलेय. (instagram/smriti_mandhana/)
स्मृतीने 2014 मध्ये इंग्लंडच्या विरोधात कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात स्मृतीने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरोधात पहिले वनडे शतक झळकावलं होतं. (instagram/smriti_mandhana/)
आज झालेल्या वुमेन्स प्रिमिअर लीगच्या लिलावात स्मृतीवर कोट्यवधींची बोली लागली आहे. आरसीबीच्या संघाने 3.4 कोटी रुपयांत स्मृतीला आपल्या संघात घेतलेय. (instagram/smriti_mandhana/)