Shubman Gill : रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती, शुभमन गिलकडे नेतृत्त्व, झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेणार
बीसीसीआय झिम्बॉब्वेच्या दौऱ्यासाठी दिग्गज खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. यावेळी भारतीय संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे दिलं जाऊ शकतं. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावेळी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग यांना संघात स्थान दिल जाऊ शकतं. संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 जणांच्या संघात निवड झाली होती. मात्र, त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
अभिषेक शर्मा, रियान पराग, नितीश राणा, तुषार देशपांडे, हर्षित राणा हे खेळाडू टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतात.
बीसीसीआय आगामी झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकतात. बीसीसीआय विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या सारख्या दिग्गजांना विश्रांती दिली जाऊ शकते.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरच्या नावाची चर्चा आहे. गौतम गंभीरचं नाव अंतिम मानलं जात आहे. मात्र, झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर भारताचं प्रशिक्षक पद व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिलं जाऊ शकतं.