आयसीसी रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरची झेप, विराट-रोहितची घसरण
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (ICC) नुकतीच टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली असून यात भारताच्या श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या दमदार फलंदाजीमुळे 27 क्रमांकाची उडी घेत तो 18 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज विराट कोहली मात्र खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तो सुमार कामगिरीमुळे 10 क्रमांकावरुन थेट 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
हिटमॅन रोहित शर्माही टॉप 10 मध्ये नसून 13 व्या क्रमांकावर आहे.
टॉप-10 फलंदाजांचा विचार करता पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे.
तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान कायम आहे.
तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चौथ्या क्रमांकावर इंग्लंडता डेविड मलान आहे.
न्यूझीलंडचा डेवोन कॉन्वे पाचव्या नंबरवर आहे.
भारताचा केवळ एकच फलंदाज या रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये आहे. केएल राहुल 10 व्या क्रमांकावर आहे.