पावसाने पाकिस्तानला वाचवले, शोएब अख्तर बाबर सेनेवर भडकला
रविवारी पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकला नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. बाबरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शोएब अख्तरला पटला नाही. (फोटो- PTI संग्रहित छायाचित्र)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी खेळ थांबला तेव्हा भारताने 24 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. विराट आणि राहुल नाबाद आहेत. (फोटो- PTI संग्रहित छायाचित्र)
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात करुन दिली. दोघांनी शतकी भागिदारी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. (फोटो- PTI संग्रहित छायाचित्र)
रोहित आणि गिल यांची फलंदाजी पाहिल्यानंतर शोएब अख्तर याने पाकिस्तान संघावर टीका केली. पावसाने आज पाकिस्तान संघाला वाचवले, असे अख्तर म्हणालाय. (फोटो- PTI संग्रहित छायाचित्र)
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचारघेतला. रोहित शर्माने 56 तर गिल याने 58 धावांची खेळी केली. (फोटो- Shoaib Akhtar संग्रहित छायाचित्र)
बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय शोएब अख्तर याला पटला नाही. (फोटो- Shoaib Akhtar संग्रहित छायाचित्र)
यावरुन शोएब अख्तर याने ट्वीट करत टीका केली आहे. अख्तर याने आपल्या ट्वीटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करत पाकिस्तान संघाला झापलेय. (फोटो- Shoaib Akhtar संग्रहित छायाचित्र)
पावसाने पाकिस्तान संघाला वाचवले. साखळी सामन्यात भारताला पावसाने वाचवले होते. पण आता सुपर 4 च्या सामन्यात पाकिस्तानला वाचवले. सोमवारी सामना व्हायला हवा.. असेही अख्तर याने म्हटलेय. (फोटो- Shoaib Akhtar संग्रहित छायाचित्र)