Shardul Thakur Wedding : शार्दुल-मिताली विवाहबंधनात! पाहा लग्नाचे फोटो

Shardul Thakur Wedding : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. प्रेयसी मित्ताली परुळकरसोबत त्याने लगिनगाठ बांधली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकरी शार्दुलला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.

शार्दुल-मिताली यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. लग्नाआधी हळदी आणि संगिताचा कार्यक्रम पार पडला होता.
शार्दुल आणि मितालीच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शार्दुल ठाकूर आणि मिताली यांनी मुंबईत आज लग्न केलेय.
शार्दुल-मिताली यांचा नोव्हेंबर २०२१ मध्ये साखरपूडा झाला होता. बऱ्याच वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांनीही शार्दूलच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली होती. त्याशिवाय युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई संघातील काही खेळाडूंनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली होती.