Saurabh Netravalkar : मुंबईकर सौरभ नेत्रावळकरकडून रोहित अन् विराटचा करेक्ट कार्यक्रम,सोशल मीडियावर मीम्सची लाट
अमेरिकेकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरनं भारताला जोरदार धक्के दिले. विराट कोहलीला नेत्रावळकरनं शुन्यावर बाद केलं. तर, रोहित शर्मा देखील 3 धावा करुन बाद झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडर 19 मध्ये भारताकडून आणि मुंबईकडून सूर्यकुमार यादव सोबत क्रिकेट खेळणाऱ्या सौरभ नेत्रावळकरनं विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज फलंदाजांच्या विकेट घेत भारताला बॅकफूटवर ढकललं.
सौरभ नेत्रावळकरनं दोन विकेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक करणारे मीम्स फिरू लागले.
काही नेटकऱ्यांनी सौरभ नेत्रावळकरच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
एका नेटकऱ्यानं आयपीएलच्या फ्रँचायजीचे मालक पैसे घेऊन अमेरिकेला सौरभ नेत्रावळकरला आयपीएलच्या पुढच्या पर्वात संघात घेण्यासाठी स्पर्धा, पैशांचा ट्रक घेऊन संघ मालक रवाना असा फोटो पोस्ट केला आहे.