IND vs SL : जेफरी वेंडरसेनं भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला, रोहित ते राहुल सगळे फेल, श्रीलंकेच्या युवा गोलंदाजानं माळ लावली
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रोहित शर्माला 64 धावांवर जेफरी मेंडरसेनं बाद केलं. यानंतर भारताची फलंदाजी गडगडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुभमन गिलनं 35 धावा करत रोहितला चांगली साथ दिली होती. त्याला देखील मेंडरसेनं बाद केलं.
भारताच्या संघ व्यवस्थापनानं बदल करत शिवम दुबेला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं मात्र मेंडरसेपुढं तो शुन्यावर बाद झाला.
भारताचा अनुभवी आणि आक्रमक फलंदाज विराट कोहली देखील 14 धावा करुन मेंडरसेच्या गोलंदाजीवर बाद झाला.
आयपीएल गाजवणारा श्रेयस अय्यर देखील मेंडरसेपुढं टिकाव धरु शकला नाही. श्रेयस अय्यर 7 धावांवर बाद झाला.
केएल राहुल देखील चांगली फलंदाजी करु शकला नाही. मेंडरसेनं त्याला शुन्यावर माघारी पाठवलं.
वानिंदू हसरंगा याच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेफरी मेंडरसेनं 6 विकेट घेत भारताच्या फलंदाजीला हादरे दिले आहेत.