Rohit Sharma Press Conference : रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली विश्वचषकाची फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने टॉस, प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टी आणि परिस्थिती यासह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफायनलसाठी प्लेईंग 11 कशी असेल... यावर बोलताना रोहित शर्माने नेहमीप्रमाणेच उत्तर दिले. तो म्हणाला की, सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार असावेत.
विश्वचषक जिंकल्यास महत्वाचं होईल, पण आम्हाला जास्त उत्साही व्हायचे नाही. आम्हाला सध्या संतुलन हवे आहे.
उद्या जर तुम्ही चूक केली तर गेल्या 10 सामन्यांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीने काही फरक पडत नाही. वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे किंवा भविष्याचा विचार करणे चांगले आहे.
आम्हाला ऑस्ट्रेलियाची कमजोरी शोधून आपली ताकद वाढवायची आहे. 20 वर्षांपूर्वी काय झाले, याचा विचार करण्याची गरज नाही.
मोहम्मद शामीबद्दल रोहित म्हणाला की, संघात नसणे आणि नंतर परत येऊन अशी कामगिरी करणे सोपे नाही. जेव्हा तो खेळत नव्हता तेव्हा त्याने सिराज आणि शार्दुलला बेंचवरुन सतत मदत केली आहे.
भावनिकदृष्ट्या हा एक मोठा प्रसंग आहे. विश्वचषकाची फायनल आमच्यासाठी सर्वात मोठे स्वप्न आहे, परंतु प्रोफशनल खेळाडूंसाठी आम्हाला खेळायचा आहे. 11 खेळाडूंना मैदानात त्यांचे काम करायचे आहे. अशा परिस्थितीत शांत राहणे खूप महत्वाचे आहे.
विश्वचषकात आपल्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या 4-5 सामन्यांमध्ये आम्ही इतर संघांना 300 पेक्षा कमी धावांवर रोखले आहे.
तिन्ही वेगवान गोलंदाजांना माहित आहे की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, त्यांना त्यांचे काम कसे करायचे आहे हे माहित आहे. मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी फिरकीपटू आले आणि विकेट्स घेतल्या. प्रत्येकाला आपला रोल माहित आहे.
फायनलसाठी महत्वाचं काय आहे? यावर लक्ष द्यायला हवं. त्यासाठी खूप वेळ दिलाय.. अन् लक्ष केंद्रीत केलेय. आतापर्यंत जी तयारी केली, त्यावरच कायम राहायला हवे. पहिल्या सामन्यापासूनच आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत केलेय. फायनलमध्येही तसेच करु..असे रोहित शर्मा म्हणाला.