Art Exhibition: डोंबिवलीत रंगतंय आकर्षक चित्र प्रदर्शन! बालदिनानिमित्त लहानग्यांनी रेखाटली सुंदर चित्रं
स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु अर्थात लहान मुलांचे लाडके 'चाचा नेहरु' यांचा जन्मदिवस म्हणजे 14 नोव्हेंबर, बालदिन. या निमित्ताने यंदाही संस्कृती आणि कलेचं माहेरघर असलेल्या डोंबिवली पूर्व नगरीत चित्रकला क्लासेसच्या वतीने 'कलाविष्कार' या चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 दरम्यान आनंद बालभवन(डोंबिवली पूर्व) येथे हे चित्र प्रदर्शन पार पडत आहे.
या चित्रप्रदर्शनात लहान मुलांनी काढलेली सुंदर चित्रं लावण्यात आली आहेत.
या प्रदर्शनात 7 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांमुलींनी साकारलेल्या मनमोहक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कलाकृतींचा आनंद सर्वांना लुटता येईल. यंदाचा 'बालदिन' साजरा करण्याची ही सुंदर कल्पना आहे.
कलेची आवड असणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि या अशा अनेक मुलामुलींनी डोंबिवलीचं नाव विश्वस्तरावर न्यावं हाच निखळ उद्देश चित्रप्रदर्शनाचा आहे.
या चित्रप्रदर्शनात पेन्सिल चित्रं, कलर पेन्सिल चित्रं, वॉटरकलर चित्रं, 3D चित्रं लावण्यात आली आहेत.
लहान मुलांनी दाखवलेल्या आपल्या कलागुणांना सर्वांकडून वाव मिळत आहे.
लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील, या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. त्यांचाच वारसा पुढे चालवत बालदिनी असे कार्यक्रम घेण्यात येतात.
प्रसिद्ध चित्रकार, विविध शिल्पकार देखील या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक करत आहेत.