Rohit sharma: रोहित है तो मुमकिन है! रोहितने एकाच तडाख्यात किती विक्रम केले!
भारताचा कर्णधार रोहित शर्माने बेंगलोरच्या मैदानात वादळी शतक ठोकले. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचव्या शतकाला गवसणी घातली. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिल्याच खेळाडू ठरलाय. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माने फक्त 69 चेंडूवर 121 धावांचा पाऊस पाडला. या शतकी खेळीमध्ये रोहित शर्माने 11 चौकार आणि आठ षटकार ठोकले. (Photo Credit : PTI)
रोहित शर्माने आजच्या वादळी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहूयात रोहितने एकाच तडाख्यात किती विक्रम केले. (Photo Credit : PTI)
टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतक ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. रोहित शर्माने सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मागे टाकलेय. सूर्या आणि मॅक्सवेल यांच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार चार शतकांची नोंद आहे. पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. (Photo Credit : PTI)
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी केली. यामध्ये आठ गगनचुंबी षटकर ठोकले. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार म्हणून विक्रम केलाय. (Photo Credit : PTI)
टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर विक्रम झालाय. याआधी कोणत्याही कर्णधाराला एका सामन्यात आठ षटकार मारता आले नव्हते. (Photo Credit : PTI)
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा विक्रमात रोहित शर्माची आजची खेळी तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या शुभमन गिलच्या नावावर आहे. (Photo Credit : PTI)
रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी कठीण परिस्थिती भारताचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची भागिदारी केली. टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. (Photo Credit : PTI)
टी 20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहित आणि रिंकू यांनी केलाय. रिंकू आणि रोहित यांनी 20 व्या षटकात 36 धावा लुटल्या होत्या. याआधी एकाच षटकात युवराजने 36 धावा काढल्या. युवराजच्या या विक्रमाची आज बरोबरी केली. (Photo Credit : PTI)
बेंगलोरमध्ये शतकी खेळी करत रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने माजी कर्णधार विराट कोहली याचाही विक्रम मोडीत काढला(Photo Credit : PTI)
रोहित शर्मा आता भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार झालाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहली आता दुसर्या क्रमांकावर घसरलाय. रोहित शर्माने टी 20 मध्ये कर्णधार असताना 1572 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कर्णधार असताना टी20 क्रिकेमध्ये 1570 इतक्या धावा ठोकल्या होत्या. आज हा विक्रम मोडीत निघाला.(Photo Credit : PTI)