sneeze frequently regular: वारंवार शिंका येतात? करा हे उपाय
शिंका येणं हा शरीराच्या प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे, परंतु जर शिंका वारंवार आणि सतत येत असतील तर ती एक समस्या असू शकते. Photo credit: Unsplash
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंका येण्याचे कारण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मानली जाते.Photo credit: Unsplash
नाकात एक श्लेष्मल त्वचा असते ज्याच्या ऊती आणि पेशी अतिशय संवेदनशील असतात, जेव्हा हे ऊतक आणि पेशी बाहेरील कोणत्याही उत्तेजक गंध किंवा वस्तूच्या संपर्कात येतात तेव्हा शिंका येणं सुरू होतं. Photo credit: Unsplash
याशिवाय, कधीकधी शिंकण्याचे कारण धूळ, बुरशी, तीव्र प्रकाश, तीव्र वास, मसालेदार अन्न, सामान्य सर्दी इत्यादीसारख्या विशिष्ट गोष्टींची ऍलर्जी देखील असू शकते. Photo credit: Unsplash
शिंकणे थांबवण्यास फायदेशीर असणाऱ्या काही उपायांची आज आपण माहिती घेऊयात. मध हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस असलेले एक उत्तम औषध आहे. Photo credit: Unsplash
त्यामुळे शिंकण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. वाफ घेतल्यानेही ही समस्या आटोक्यात ठेवता येते आणि नाकातून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा होतो.Photo credit: Unsplash
तुम्हाला फक्त एका भांड्यात पाणी गरम करायचे आहे आणि तुमचे डोके टॉवेलने झाकायचे आहे आणि येणारी वाफ इनहेल करायची आहे. Photo credit: Unsplash
व्हिटॅमिन सीने समृद्ध अन्न रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, शिंका येण्याची समस्या टाळण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. व्हिटॅमिन सीसाठी संत्री, मोसमी, लिंबू, आवळा इत्यादी आंबट पदार्थांचे सेवन करावे. Photo credit: Unsplash
हळदीचे दूध हळद ही अँटी-एलर्जिक मानली जाते. गरम दुधात हळद टाकून रोज प्या. यामुळे वारंवार शिंकण्याच्या समस्येवर मात करता येते. Photo credit: Unsplash
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.Photo credit: Unsplash