Rohit Sharma Celebration Dubai : माँ तुझे सलाम! बार्बाडोसमध्ये गाडला होता तिरंगा, आता दुबईच्या खेळपट्टीवर रोहित शर्माने कसं केलं सेलिब्रेशन? पाहा डोळे भरून आणणारे Photo

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 76 धावांची शानदार स्फोटक खेळी खेळून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या बॅटमध्ये अजूनही आग आहे हे दाखवून दिले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अवघ्या 10 महिन्यांतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला.

29 जून 2024 रोजी, जेव्हा टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून ट्रॉफी जिंकली.
तेव्हा 'हिटमॅन' रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीवर झेंडा रोवून आनंद साजरा केला.
काल, जेव्हा भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडला हरवून जगभर तिरंगा फडकवला.
तेव्हा रोहित शर्माने पुन्हा एकदा असे सेलिब्रेशन केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनल्यानंतर तेव्हा रोहितने भारतीय तिरंगा अंगावर गुंडाळला आणि ट्रॉफीला घेत स्वतःचा फोटो काढला.
रोहित शर्माची सेलिब्रेशन स्टाईल पाहून भारतीय चाहत्यांचे डोळे भरून आले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाने 12 वर्षे वाट पाहिली आणि मग हा दिवस आला.
टीम इंडियाने 10 महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे आणि तीही अपराजित राहून. दोन्ही स्पर्धांमध्ये टीम इंडिया अंतिम सामन्यापर्यंत अपराजित राहिली.