IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहितचा मोठा विक्रम, दिग्गजांना टाकलं मागे
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात रोहित शर्माच्या 44 धावांनी एक नवा रेकॉर्ड रोहितच्या नावावर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामना भारताने 62 धावांनी जिंकला, कर्णधार म्हणून सामना जिंकण्याच्या आनंदासोबत रोहितने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर या सामन्यातील 44 धावांमुळे 3 हजार 307 धावा जमा झाल्या असून या कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.
रोहितने विराट आणि गप्टील यांना आज मागे टाकले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहितने 2 चौकार आणि एक षटकार लगावत 32 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 3 हजार 307 धावा पूर्ण केल्या आहेत.
विराटच्या नावावर 97 सामन्यांत 3 हजार 296 धावा आहेत.
तर गप्टीलच्या नावावर 112 सामन्यांत 3 हजार 299 धावा आहेत.
रोहित कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी करत आहे.