Saiyami Kher: सैयामी खेरनं सांगितला किस्सा; म्हणाली, '18 व्या वर्षी लोकांनी...'
सैयामी खेर (Saiyami Kher) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. सैयामी ही सध्या 'घूमर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका मुलाखतीमध्ये सैयामीनं एक किस्सा सांगितला. तिनं सांगितलं, वयाच्या 18 व्या वर्षी तिला काही लोकांनी ओठ आणि नाकाची सर्जरी करुन घेण्याचा सल्ला दिला होता.
एका मुलाखतीमध्ये सैयामीनं सांगितलं जेव्हा मी करिअरला सुरुवात करत होतो, तेव्हा बरेच लोकांनी मला लिप जॉब आणि नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिली होती. मला वाटते की, वयाच्या 18 व्या वर्षी हा सल्ला देणे चुकीचे आहे. हा माझा अनुभव आहे.
पुढे सैयामीनं सांगितलं बॉलिवूड इंडस्ट्रीच्या या नियमांचा मला त्रास झाला नाही पण, मला आशा आहे की, एक ना एक दिवस या सर्व गोष्टी आपल्या इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे गायब होतील.
आर. बाल्की यांनी घुमर हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सैयामीसोबतच अभिनेता अभिषेक बच्चन आणि अंगद बेदी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
'मिर्झ्या' या चित्रपटातून सैयामीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता सैयामीच्या घुमर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सैयामीचा घूमर हा चित्रपट 18 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. सैयामीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.