Ranji Trophy : दिग्गज खेळाडूंची कारकीर्द पणाला! आजपासून रंगणार रणजी ट्रॉफीचा थरार, रोहित शर्माची बॅट चालणार?
रणजी ट्रॉफी 2024-25 चा दुसरा टप्पा 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धा दोन भागात खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणजीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाने पाच सामने खेळले होते. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक संघ दोन सामने खेळेल.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरीनंतर दिग्गज खेळाडूंची कारकीर्द पणाला लागली आहे.
दीर्घ कालावधीनंतर यंदा रणजी लढतीत रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल हे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर तंदुरुस्त असलेल्या प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले.
या कारणास्तव, टीम इंडियाच्या अनेक मोठ्या खेळाडूंनी 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे
रोहित शर्मा जवळपास एका दशकानंतर गतविजेत्या मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.
रोहित, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईकडून खेळण्यास सज्ज आहे. मुंबईला पुढील सामन्यात जम्मू-काश्मीरच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल.