In Pics : अनुभवी अष्टपैलू आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी, बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 34 वर्षे जुना रेकॉर्ड तोडला
भारताने बांगलादेश दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना 3 विकेट्सने जिंकत दमदार कामगिरी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने दुसऱ्या सामन्यातील या विजयासह मालिका 2-0 अशी जिंकली.
सामन्यात अष्टपैलू आर. अश्विनने नावाला साजेशी अष्टपैलू खेळी करत सामना जिंकवण्यात मोलाचं योगदान दिलं.
त्याने सामन्याच्या दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स तर पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात नाबाद 42 धावा केल्या.
यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं असून सोबतच त्याने एक दमदार रेकॉर्डही नावावर केला आहे
कसोटी सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना 9 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड अश्विनने केला आहे.
त्याने बांगलादेशने दिलेल्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 42 धावा करत हा इतिहास रचला.
याआधी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्सेट बेंजामिन यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावांची खेळी केली होती. पण अश्विनने 42 धावा करत हा विक्रम मोडत नवा रेकॉर्ड केला आहे.
विशेष म्हणजे याच कसोटीत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्ससह 3000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
यासह तो कपिल देव, शेन वॉर्न या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.