Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma IPL 2025 : मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट; प्रीती झिंटाच्या ताफ्यात जाणार रोहित शर्मा? 'या' वक्तव्यामुळे रंगली चर्चा
पुढील वर्षी आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे, ज्याची संपूर्ण क्रिकेट जग आतुरतेने वाट पाहत आहे. पण दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशा परिस्थितीत जर 'हिटमॅन' लिलावात उतरला तर त्याच्यावर सर्वाधिक बोली लागणार हे नक्की.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर रोहित शर्मा आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात उतरला तर बोली युद्ध निश्चित आहे. सर्व 10 संघांना रोहितला खरेदी करायला आवडेल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पंजाब किंग्सही या दिग्गज खेळाडूला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत.
मात्र, पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर म्हटले की, रोहितला विकत घेणे हे आमच्या पर्सवर अवलंबून आहे. मेगा लिलाव झाल्यास, फ्रँचायझींना संपूर्ण संघ तयार करावा लागेल.
संजय बांगर रोहित शर्माबाबत म्हणाले की, जर तो लिलावात दिसला तर त्याच्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आम्ही त्याला विकत घेऊ की नाही हे आमच्याकडे किती पैसे आहेत यावर अवलंबून असेल. त्याला खरोखर विश्वास आहे की सर्व फ्रँचायझींची नजर रोहित शर्मावर असेल आणि त्याच्या नावावर मोठ्या बोली लागतील.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर अशा बातम्या येत आहेत की, रोहित पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2025 मेगा लिलावात सहभागी होऊ शकतो. आता हिटमॅनने लिलावात भाग घेतला तर 17 वर्षांचा बोलीचा विक्रम मोडीत निघणार हे नक्की. त्याला विकत घेण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतील.
दरम्यान एक असा अहवाल समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच हादरवले आहे. एका पत्रकाराने असा दावा केला आहे की मुंबई इंडियन्सचे दोन प्रतिस्पर्धी संघ - दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG), फक्त रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही फ्रँचायझीने या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही.
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्स आपल्या नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे रोहित शर्माचा समावेश करण्याचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मानले जात आहे.
मागील हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व शिखर धवनने केले होते. शिखर धवनने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो आयपीएल खेळणार की नाही याबाबतची परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, रोहित शर्मा पंजाबमध्ये सामील झाल्यास त्याला संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.