Janmashtami 2024 : छोट्या पडद्यावर 'या' सात कलाकारांनी साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका, प्रसिद्ध अभिनेत्याला मिळालंय सर्वात कमी मानधन
अभिनेते नितीश भारद्वाज यांना आजही श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली. 1980 च्या दशकात या भूमिकेसाठी नितीश यांना एका एपिसोडसाठी कथितपणे 3000 रुपयांचे मानधन मिळत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितीश भारद्वाज यांनी साकारलेल्या भूमिकेने एक उंची गाठली होती. मात्र, रामानंद सागर यांच्या 'श्रीकृष्ण' मालिकेत सर्वदमन डी. बॅनर्जी यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिकाही लोकप्रिय ठरली होती. एका एपिसोडसाठी सर्वदमन डी. बॅनर्जी यांना 10 हजार रुपये इतके मानधन मिळाले असल्याचे म्हटले जाते.
अभिनेता स्वप्नील जोशी हे भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असणारे नाव आहे. स्वप्नील जोशी याने उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण या दोन्ही लोकप्रिय मालिकेत काम केले. या दोन्ही मालिकांचे दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते. श्रीकृष्ण मालिकेत स्वप्नील जोशी याने युवा कृष्णाची भूमिका साकारली होती. एका वृत्तानुसार, स्वप्नील जोशी याला 20 लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते. कथितपणे स्वप्नील जोशीने प्रति एपिसोड 8500 रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते.
अभिनेता सौरभ राज जैन याने सिद्धार्थ कुमार तिवारीच्या महाकाव्य शो 'महाभारत'मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे सौरभ राज हा चांगलाच लोकप्रिय झाला. सौरभ राजने एका एपिसोडसाठी 2.50 लाख रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते.
अभिनेता सौरभ पांडे हे छोट्या पडद्यावरील चांगलेच प्रसिद्ध नाव आहे. सूर्यपुत्र कर्ण या मालिकेत सौरभने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. एका वृत्तानुसार, सौरभने कथितपणे एक ते 1.50 लाख रुपये मानधन घेतले होते.
स्टार भारत वरील मालिका 'राधाकृष्ण' मधील युवा कृष्णाच्या भूमिकेतून या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. काही वृत्तांनुसार, सुमेधने प्रत्येक एपिसोडसाठी 65,000 रुपये इतके मानधन घेतल्याचे म्हटले जाते.
आपण अनेक बाल कलाकारांना टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये बाल कृष्णाची भूमिका साकारताना पाहिले आहे आणि जवळजवळ सर्वांनी उत्कृष्ट काम केले आहे परंतु धृती भाटियाचे नाव आजही सर्वांच्या स्मरणात आहे. वृ्त्तानुसार, धृतीला प्रति एपिसोड 20,000 रुपये मानधन मिळत होते.