World Cup 2023 : विश्वचषकात कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम, धोनीसह अजहरूद्दीनलाही टाकलं मागे
रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळत आहे. 36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.
रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्याद्वारे कर्णधार म्हणून एक विशेष कामगिरी केली आहे.
टीम इंडिया रविवारी 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील पहिला सामना खेळला आणि या दिवशी रोहित शर्माचं वय 36 वर्ष 161 दिवस होतं.
त्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात भारताचे कर्णधार करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
या कामगिरीत रोहित शर्माने धोनीसह अजहरूद्दीनलाही मागे टाकलं आहे.
या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार असताना अझरुद्दीनचे वय 36 वर्षे 124 दिवस होतं.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. 2007 एकदिवसीय विश्वचषकात भारताचं नेतृत्व करताना द्रविड 34 वर्ष 71 दिवसांचा होता.
चौथ्या क्रमांकावर माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आहे. 1979 च्या विश्वचषकात टीम इंडियाचं नेतृत्व केलं, तेव्हा श्रीनिवास वेंकटराघवन 34 वर्ष 56 दिवसांचे होते.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे नाव टॉप-5 च्या यादीत सर्वात शेवटी आहे. 2015 च्या विश्वचषकात कर्णधार धोनीचं वय 33 वर्ष 262 दिवस होतं.