IPO Update : संरक्षण क्षेत्रातील कंपनी 5000 कोटींचा आयपीओ आणणार, पैशांचं नियोजन करुन ठेवा, कमाईची मोठी संधी

भारतीय शेअर बाजार गेल्या सहा महिन्यांच्या घसरणीनंतर सावरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर गुंतवणूकदार म्हणून आयपीओमध्ये बोली लावणार असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयनॉक्स क्लीन एनर्जी कंपनी पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये आयपीओ आणणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 5000 कोटी रुपये जमवेल अशी माहिती आहे.

आयनॉक्स जीएएफएल ग्रुपकडून ऑयनॉक्स क्लीन एनर्जीला शेअर बाजारात लिस्ट केलं जाणार आहे. याद्वारे 50000 कोटींच्या मूल्यांकनावर जनतेकडून 10-15 टक्के भागिदारी गोळा करणं हे आहे.
ऑयनॉक्स क्लीन एनर्जीचा आयपीओ खासगी क्षेत्रातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ असेल.
सूत्रांच्या माहितीनुसार हा आयपीओ 2025-26 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येणार आहे.आयपीओच्या लाँचिंगसाठी पाच प्रमुख बँकांची निवड करण्यात आल्याची माहिती आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)