Mohammed Shami : बोर्डाने मोहम्मद शमीबाबत घेतला मोठा निर्णय! ऑस्ट्रेलियाला जाणार नाही की नाही? जाणून घ्या
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पराभवानंतर सर्वांनाच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आठवू लागला, जो एका वर्षाहून अधिक काळ टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप त्याच्याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही.
मोहम्मद शमीचा आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी बंगालच्या 20 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. कारण तो ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी आपली तंदुरुस्ती सिद्ध करू पाहत आहे.
ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीनंतर रोहित शर्मा म्हणाला होता की, शमीसाठी ऑस्ट्रेलियात संघात येण्यासाठी दरवाजे पूर्णपणे खुले आहेत, परंतु शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच संघात परतावे अशी त्याची इच्छा आहे. भारत सध्या ब्रिस्बेनमध्ये तिसरी कसोटी खेळत आहे आणि चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे.
शमीच्या घोट्यावर या वर्षी फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या रणजी स्पर्धेत त्याने पुनरागमन केले आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्स घेतल्या. यानंतर, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी सर्व 9 सामने खेळले आणि 7.85 च्या इकॉनॉमीने 11 बळी घेतले.
मोहम्मद शमी व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार देखील बंगाल संघाचा एक भाग आहे. संघ 21 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये दिल्लीविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
सर्व खेळाडू बुधवारी कोलकाताहून हैदराबादला रवाना होतील. विजय हजारे ट्रॉफी 21 डिसेंबर ते 18 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.