In Pics : झुलन गोस्वामीता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, बीसीसीआयनं शेअर केले इमोशनल फोटो
भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आज इंग्लंडविरुद्ध तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दशकं भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या झुलन गोस्वामीनं जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय.
इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असं तिनं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे
या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना बीसीसीआयनं झुलन गोस्वामीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात झुलन गोस्वामीनं भारतीय संघाची जर्सी घालून देशाचं राष्ट्रगीत गाणं, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण राहतील, असं म्हटलंय.
लॉर्ड्स येथे खेळवल्या जाणाऱ्या अखेरचा एकदिवसीय सामन्यात झुलन गोस्वामीनं अखेरचं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
झुलनंच्या निवृत्तीच्या सामन्यावेळी सर्वचजण भावूक झाल्याचं दिसून आलं.
झुलन गोस्वामीनं आतापर्यंत 12 कसोटी, 203 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय.
तिनं कसोटीत 44, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 253 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे.
झुलनंच्या जीवनावर लवकरच सिनेमा येणार असून यामध्ये अनुष्का शर्मा झुलनचं पात्र साकारणा आहे. छपरा एक्सप्रेस असं सिनेमाचं नाव आहे.