ईशान किशनचा द्विशतकी धमाका, युनिवर्स बॉसचा विक्रमही मोडला
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडीजचा (West Indies) विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता.
2015 मध्ये युनिवर्स बॉस गेलने झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) एकदिवसीय सामन्यात 138 चेंडूत 200 धावांचा पाऊस पाडला होता.
बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशननं विक्रमी द्विशतक ठोकून जगासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ईशान किशन टॉपवर गेलाय. त्यानं अवघ्या 126 चेंडूत हा पराक्रम केलाय. त्यानंतर या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
138 चेंडूसह वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सचिन तेडुलकर 147 चेंडूसह चौथ्या आणि पाकिस्तानचा फखर जमान 148 चेंडूसह पाचव्या क्रमांकावर आहे.
ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी द्विशतक आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकानंतर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं तिसरा आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या संघाला अवघ्या 182 धावांवर रोखलं.