PHOTO: 'गेमचेंजर' ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाची खास दृश्यं पाहून तुम्हीही म्हणाल; काय रस्ता, काय निसर्ग अन् काय समृद्धी!
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या टप्पात- नागपूर आणि शिर्डी दरम्यानचे 520 किमी लांब महामार्ग बांधला गेला आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हयातून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या शहरी भागातून जातो.
या महामार्गामुळे, इतर 14 जिल्ह्यांशी असलेल्या संपर्क व्यवस्थेतही सुधारण होईल.
तसेच, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या विकासाला हातभार लागेल.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल.
हा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा वेरूळ लेण्या, शिर्डी, लोणार अशा पर्यटन स्थळांनाही जोडला जाईल.
प्रवाशांसाठी आरामासाठी द्रुतगती महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या रस्त्यांमुळे प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होऊन शेतमालाची जलद वाहतूक होण्यास मदत होईल. या भागातील उद्योग आणि उत्पादन केंद्राची क्षमता वाढेल.
या परिसरातील वन्यजीवांना हानी पोहोचू नये यासाठी 100 वन्यजीव मार्ग तयार करण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्वपूर्ण असलेल्या ठिकाणी 'ध्वनी रोधक' ची तरतुद करण्यात आली आहे.
या रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखाहून अधिक झुडपे व वेलींचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पर्यावरणाचे जतन होण्यास मदत होईल.
प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तसेच अपघात झाला तर तात्काळ मदत मिळावी यासाठी 15 वाहतूक साहाय्य केंद्रे, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी 21 जलद प्रतिसादवाहने आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमसह 21 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील.