IPL 2025: आयपीएलच्या पुढील हंगामात होऊ शकतात तीन मोठे बदल, मेगा ऑक्शनपूर्वी फ्रंचायजीची महत्त्वाची बैठक
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या तयारीला सुरुवात झाली आहे.आयपीएलच्या संघांच्या अधिकाऱ्यांनी टुर्नामेंट अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यामध्ये तीन प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. यामध्ये मेगा ऑक्शन दर पाच वर्षांनी घेण्यात यावं. 4 ते 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी दिली जावी या प्रमुख मागण्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल फ्रंचायजी तीन वर्षांऐवजी पाच वर्षांनी मेगा ऑक्शन करण्यात यावं अशी भूमिका घेणार आहेत. याशिवाय प्रत्येक संघाला कमीत कमी 8 राइट टू मॅचचा पर्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.यामुळं फ्रचायजी कोणत्याही खेळाडूवर मोठी बोली लावू शकतात.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार एका फ्रंचायजीच्या अधिकाऱ्यानं 5 वर्षांनी मेगा ऑक्शनचा निर्णय घेतला गेल्यास संघांना त्याचा फायदा होईल. याकाळात युवा खेळाडूंना तयार करता येऊ शकतं. यामुळं अनकॅप्ड प्लेअर्सना फायदा होईल, असं फ्रंचायजीच्या अधिकाऱ्यांचं मत आहे.
आयपीएल फ्रंचायजी आरटीएमची संख्या वाढवून 8 करावी यासाठी आग्रही आहेत. यामुळं संघांना त्यांच्या कोर प्लेअरला ऑक्शनमध्ये रिटेन करण्यात मदत होईल.
आयपीएल अधिकारी आणि फ्रंचायजी प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली मात्र अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. आयपीएलच्या 18 व्या हंगामात अनेक संघांना नव्या कॅप्टनचा शोध आहे. त्यामुळं मोठे खेळाडू वेगवेगळ्या संघात जाऊ शकतात.