Kolhapur Rain Update : पचगंगा नदी धोक्याच्या तोंडाला अन् घोर जीवाला! राधानगरी धरण 93 टक्के भरले; पाऊस वाढल्यास महापुराची भीती
कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीच्या तोंडाला गेल्याने चिंता वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज (24 जुलै) सायंकाळी पाच वाजता राजाराम बंधाऱ्यावर 42.5 इंचावर पंचगंगेची पाणीपातळी पोहोचली आहे.
उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास महापुराची धास्ती आहे.
राधानगरी धरण क्षेत्रातही मोठा पाऊस सुरु आहे. धरण आतापर्यंत 93 टक्के भरले आहे. उद्या संध्याकाळपर्यत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणाच्या विद्युतगृह विसर्ग 1500 क्युसेक्सने सुरु आहे.
दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये 1600 घनफूट प्रतिसेकंद(क्यूसेक्स) पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
आज कोल्हापूर शहराला लागून असलेला कळंबा तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे आता सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने ते पाणी सुद्धा शहराच्या दिशेनं वाहत जात आहे.
त्यामुळे उद्या ऑरेंज अलर्टला पाऊस झाल्यास पाणी पातळी वेगाने वाढण्याची धास्ती आहे.
पुरग्रस्त भागातून जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे.