IPL 2025: विराटसोबत खेळला, भारताला विश्वचषक जिंकून दिला; कोहलीचा मित्र आता IPL मध्ये अंपायरिंग करणार!

भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात 2008 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्या हा विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताने बाजी मारली होती.

अंतिम सामन्यात तन्मन श्रीवास्तव याने भारताकडून महत्वाची खेळी केली होती आणि भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला होता. तोच तन्मय श्रीवास्तव आता आयपीएलमध्ये अंपायरच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारताला विश्वचषक जिंकून देण्यात सर्वात मोठी भूमिका तन्मय श्रीवास्तवची होती.
तन्मय श्रीवास्तवने या टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 262 धावा केल्या होत्या. इतकंच नव्हे तर अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण 43 धावांची खेळी केली होती.
विश्वचषकातील या चांगल्या कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
तन्मय श्रीवास्तवने आयपीएल 2008 आणि 2009 च्या हंगामात पंजाब किंग्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही.
तन्मय श्रीवास्तवने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, तन्मयने अंपायरिंगला सुरुवात केली आणि आता बीसीसीआयचा क्वालिफाई पंच देखील झाला.
तन्मय आयपीएल 2025 मध्ये पंचांच्या भूमिकेत दिसणार याची माहिती उत्तर प्रदेश क्रिकेटने फोटो पोस्ट करत दिली आहे.
आयपीएल 2025 चा हंगाम 21 मार्चपासून रंगणार आहे.