PHOTO : टीम इंडियाच्या चार खेळाडूंना निवड समितीचा मेसेज
वृद्धीमान साहालाही संघातून डच्चू देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेगवान गोलंदाज ईशांत शर्मालाही वगळण्यात आले आहे.
वृद्धीमान साहाला पर्याय म्हणून ऋषभ पंत विकेटकीपिंगमध्ये सर्वोत्तम उमेदवार आहे,
गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामगिरीत सातत्या न राखणाऱ्या अजिंक्य रहाणे याला डच्चू देण्यात आला आहे. रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते.
चेतन शर्मा म्हणाले की, 'आम्ही कोणाचे दरवाजे बंद करणार नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला धावा करायच्या आहेत, विकेट घ्यायच्या आहेत आणि मग तुम्ही देशासाठी खेळू शकता.
कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा यालाही भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे.
मागील एक वर्ष अजिंक्य रहाणेसाठी खूपच संघर्षपूर्ण राहिले आहे. 2021 मध्ये 33 वर्षीय अजिंक्य रहाणेला फक्त 479 धावाच करता आल्या आहेत.
2021 मध्ये चेतेश्वर पुजाराला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 14 कसोटी सामन्यात पुजाराला 28 च्या सरासरीने फक्त 702 धावाच करता आल्या.
पुजाराला एकही शतक झळकावता आले नाही. सहा अर्धशतके झळकावली आहे. पुजाराचा स्ट्राईक रेट फक्त 34 इतकाच राहिला आहे. खराब स्ट्राईक रेटमुळे पुजाराला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला होता.
अजिंक्य रहाणे याला निवड समितीने रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला आहे.
अजिंक्य रहाणेसोबतच वृद्धीमान साहालाही रणजीमध्ये खेळण्यास सांगितले आहे.
ईशांत शर्माने रणजीत चांगली कामगिरी केली तर तो भारतीय संघात पुनरागम करेल असे समितीने म्हटले आहे.