Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला!
![Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला! Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/1c6fd1fe5abf51f743a2187e81eefe00dc296.png?impolicy=abp_cdn&imwidth=800)
भारतीय क्रिकेटसंघाचा हरहुन्नरी खेळाडू शिखर धवन त्याच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक समस्यांचा सामना करत असल्याचं चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला! Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/a1808e20439d12af078bd7185e3e1fd895fc5.png?impolicy=abp_cdn&imwidth=800)
सध्या शिखर आणि त्याची पत्नी आयेशा यांच्यामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे.
![Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला! Shikhar Dhawan: तीन वर्षांनंतर शिखर धवन भेटणार मुलाला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/09/9301756d44bdba2a07f425922458ec670dda4.png?impolicy=abp_cdn&imwidth=800)
शिखरपासून वेगळं झाल्यानंतर आयेशा ही मुलगा जोरावर सोबत ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली.
परंतु दिल्ली कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय या प्रकरणात दिला आहे.
शिखरच्या कुटुंबात काही कार्यक्रम असल्यामुळे त्याचा मुलगा जोरावर याला भारतात आणण्याचे निर्देश दिल्लीच्या कुटुंब न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून शिखर त्याचा मुलगा जोरावर याला भेटला नाही आहे.
आधी हा कार्यक्रम 17 जून रोजी आयोजित करण्यात आला होता, परंतु तेव्हा आयेशा हिने जोरावरच्या शाळेचे कारण दिले होते.
त्यामुळे धवन कुटुंबियांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता हा कार्यक्रम 1 जुलै रोजी होणार आहे.
त्यामुळे बऱ्याच काळानंतर या बाप लेकांची भेट होणार आहे.
शिखर धवनला त्याच्या मुलासोबत वेळ घालवण्याची संधी देखील यानिमित्ताने भेटणार आहे.