Share Market Closing Bell : IT-FMCG मध्ये नफा वसुलीचा जोर; घसरणीसह बाजार बंद
आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक बाजारात चांगले सकारात्मक संकेत दिसत असतानाही गुंतवणूकदारांनी नफावसुली केली.
आज दिवसभरातील व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स 223 अंकांच्या घसरणीसह 62,625 आणि निफ्टी 71 अंकांच्या घसरणीसह 18,563 अंकांवर स्थिरावला.
ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, बँकिंग, मीडिया, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस आदी सेक्टरमध्ये शेअर घसरले.
मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येही नफावसुली दिसून आली.
निफ्टीतील 50 पैकी 16 स्टॉक्स आणि सेन्सेक्समधील 30 पैकी 11 शेअर तेजीसह बंद झाले.
इंडसंइड बँक, अॅक्सिस बँक, लार्सन, पॉवर ग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, एनटीपीसी, बजाज फायनान्स, आदी कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले.
टाटा स्टील, एसबीआय, एचयूएल, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी, एशियन पेंट्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
आज बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली.
बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 286.72 लाख कोटी रुपये इतके झाले. गुरुवारी हे बाजार भांडवल 287.51 लाख कोटी होती. शुक्रवारी जवळपास गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 79,000 कोटींची घट झाली.