In Pics : जसप्रीत बुमराह करतोय सुट्टी एन्जॉय, पत्नी संजनासोबतचे फोटो केले शेअर
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह वेस्टइंडीजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात खेळणार नसून त्याने विश्रांती करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे तो सध्या सुट्टी घेऊन पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) सोबत हॉलीडे एन्जॉय करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजसप्रीतने हे सुट्टीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या तो आणि संजना दोघेही सिंपल लूकमध्ये दिसत आहेत.
जसप्रीत आणि संजना यांनी प्रेमविवाह केला असून जसप्रीत स्टार क्रिकेटर असून गणेशन ही एक टीव्ही अँकर आहे. ती स्पोर्ट्स अँकरींग करण्यात तरबेज आहे.
दिनेश कार्तिकला दिलेल्या एका मुलाखतीत बुमराहने संजनासोबतच्या रिलेशनबद्दल सांगितलं होतं. 2019 च्या विश्वचषकादरम्यान ते दोघं एकमेंकाजवळ आल्याचं त्याने सांगितलं होतं.
संजनाने अनेकदा बुमराहची मुलाखत घेतली असून त्यांच्या व्हिडीओजवर प्रेक्षक फार प्रेम दाखवतात.
दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असून भटकंतीची त्यांना आवड असल्याचं दिसून येतं.
मागील वर्षी कोरोना महामारी असताना दोघांनी 15 मार्च रोजी लग्न केलं होतं.
बुमराह सध्या भारताचा प्रमुख गोलंदाज असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भारतीय गोलंदाजी अवलंबून असते.