Indian Cricket Team : टीम इंडियाच्या स्वागतासाठी दिल्लीतील हॉटेलने बनवला स्पेशल केक; ढोल ताशांच्या गजरात मायदेशी जल्लोषात स्वागत

टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

टीम इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर भारताने हे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
याच निमित्ताने दिल्लीतील आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडियासाठी स्पेशल केक बनवला आहे.
विश्वविजय टीम इंडियाच्या थीमवर आधारित हा केक तयार करण्यात आला आहे. यासाठी हॉटेलच्या स्टाफने संपूर्ण रात्रभर मेहनत केली.
या संदर्भात आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलचे शेफ शिवनीत पाहोजा म्हणतात, केक टीम इंडिया संघाच्या जर्सीच्या रंगात आहे.
या केकचं वैशिष्ट्य म्हणजे हा केक खऱ्या ट्रॉफीसारखा दिसू शकतो, पण हा केक खास चॉकलेटपासून तयार करण्यात आला आहे.
तसेच, हॉटेलमध्ये सर्व प्लेयर्ससाठी खास भारतीय पद्धतीचा ब्रेकफास्ट तयार करण्यात आला आहे.