In Pics : भारताचा झिम्बाब्वेवर विजय, मालिकेतही व्हाईट वॉश, गिलचं पहिलं वहिलं शतक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 13 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाह भारताने मालिका 3-0 च्या फरकाने खिशात घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामन्यात आधी फलंदाजीवेळी शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार असं शतक आणि गोलंदाजीत अखेरच्या षटकात शार्दूल, आवेश जोडीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत जिंकला आहे.
सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी केली. राहुल-धवन बाद झाल्यानवर गिल आणि ईशानने डाव सावरत 140 धावांची शतकी भागिदारी केली.
ईशान 50 धावा करुन बाद झाला तर शुभमनने कारकिर्दीतील पहिले शतक ठोकत 130 रन केले.
290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. त्यांचे सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत.
पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन 45 धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदरने पुढे डाव कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला.
49 व्या षटकात सिकंदर 115 धावा करुन बाद झाला. त्याने 95 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पण शार्दूलने त्याला 49 व्या षटकात शुभमनच्या हाती झेलबाद करवलं.
त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असं वाटत होतं, पण आवेशनं अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत झिम्बाब्वेचा डाव 276 धावांवर रोखत भारताला 13 धावांनी विजयी करुन दिलं.
भारताने याआधी पहिला सामना 10 विकेट्सने तर दुसरा सामना 5 विकेट्सने जिंकत मालिका 2-0 ने खिशात घातली होती.
पण आजच्या विजयामुळे भारत मालिकेत 3-0 ने झिम्बाब्वेला व्हाईट वॉश देण्यात यशस्वी झाला आहे.