भारतात Bajaj Pulsar 180 चे उत्पादन बंद, कंपनी लॉन्च करू शकते नवीन बाईक
आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाजची (Bajaj) पल्सर बाईक (Pulsar Bike) सिरीज खूप लोकप्रिय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातच पल्सर 180 बाईकसह (Pulsar 180) अनेक दुचाकींचा समावेश आहे.
मात्र आता कंपनीने आपल्या पल्सर 180 बाईकची विक्री थांबवली असून याचे उत्पादन बंद केले आहे.
याशिवाय काही डीलरशिपने सांगितलं आहे की, कंपनीने या बाईकचा स्टॉक पाठवणे बंद केला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने याचे उत्पादनही बंद केले आहे.
याची मागणीत आलेली घसरण आणि याच सिरींजमधील नवीन बाईक येत असल्याने याचे उत्पादन बंद करण्यात आले असावे, असं सांगण्यात येत आहे.
कंपनीने ही बाईक फेब्रुवारी 2021 मध्ये भारतात लॉन्च केली होती.
या बाईकचा डिझाइन बऱ्या पैकी पल्सर 150 (pulsar 150) सारखेच आहेत. पल्सर 150 मध्येच काही बदल करून ही बाईक भारतात सादर करण्यात आली होती.
बजाज पल्सर 180 ची एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये होती. बजाज पल्सर 180 मध्ये 178.6 cc, एअर-कूल्ड, DTSi इंजिन देण्यात आले होते.
जे 16.76 Bhp पॉवर आणि 14.52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
ही बाईक 15-लिटर इंधन टाकीसह येते आणि याचे वजन 151 किलो आहे. यात 17-इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. यात ड्युअल स्प्रिंगसह 5-स्टेप प्रीलोड अॅडजस्टॅबिलिटीचा वापर करण्यात आला आहे.