India vs New Zealand Champions Trophy 2025: आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; उपांत्य फेरीचा सामना कोणासोबत रंगणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामना आज 2 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने प्रथम पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशला हरवले.

भारताने प्रथम बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानचा पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंडचे 4-4 गुण आहेत पण चांगल्या नेट रन रेटमुळे, न्यूझीलंड ग्रुप अ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध 118 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताचा वरचष्मा आहे. भारताने 60 वेळा तर न्यूझीलंडने 50 वेळा विजय मिळवला आहे.
भारताने दोन सामने जिंकले आहेत; पण फिरकीपटूंनी भारतीयांना त्रस्त केले आहे.
उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड संघ याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडकडे पाच डावखुरे फलंदाज असल्याने आणि मोहम्मद शमीला दुखापत झाली असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापन या अनुभवी वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन अर्शदीप सिंगला संधी देऊ शकते.
फॉर्मात असलेला शुभमन गिल, पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावणारा विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांना न्यूझीलंडच्या फिरकीपटूंविरुद्ध प्रभावी कामगिरी करावी लागेल.