टी 20 क्रिकेटमध्ये भारताच्या नावावर मोठा विक्रम, आतापर्यंत कधीच असं झालं नव्हते
आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये भारताने आज सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान यशस्वी पार केले. याआधी 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात 208 धावांचा पाठलाग केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. भारताने आतापर्यंत 5 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. तर आफ्रिकेने चार वेळा हा पराक्रम केलाय. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी तीन तीन वेळा हा विक्रम केला आहे.
सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकले आहेत. त्याने 47 डावात 100 षटकार ठोकलेत.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. फिनिशर रिंकूने षटकार ठोकत भारताला विजयी केले.
सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा याने दोन विकेट घेतल्या. जोश इंग्लिंश याने ठोकलेल्या झंझावती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान दोन विकेट राखून सहज पार केले.