IND vs SL: यश,अपयश ते विनम्रता, क्रिकेट अन् आयुष्यावर भाष्य, सूर्यकुमार यादवनं पहिल्याच पत्रकार परिषदेत मनं जिंकली
भारतीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या टी 20 आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या निमित्तानं श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पहिली मालिका खेळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं सूर्य कुमार यादवला कर्णधार करण्यात आलं आहे. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवनं पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यानं श्रीलंकेविरुद्ध कोणती रणनीती राबवणार हे देखील सांगितलं.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला क्रिकेट म्हणजे आयुष्य नाही. क्रिकेट आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. ही गोष्ट क्रिकेटनंच शिकवली असल्याचं सूर्या म्हणाला.
क्रिकेटनं सर्वात गोष्ट शिकवली म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा तुम्ही किती विनम्र राहता किंवा चांगली कामगिरी होत नसेल तेव्हा विनम्र राहणं महत्त्वाचं असल्याचं सूर्यकुमार यादवनं म्हटलं. तुम्ही ज्या गोष्टी मैदानावर करता त्या तिथंच सोडून जायचं असतं, त्या मैदानाबाहेर घेऊन जायच्या नसतात, असं देखील त्यानं म्हटलं.
तुम्ही मैदानावर ज्या गोष्टी करता ते म्हणजे तुमचं आयुष्य नसतं. तो तुमच्या आयुष्यातील एक भाग असतो, ते तुमचं जीवन नसतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी करता त्यावेळी टॉपवर असाल आणि चांगली कामगिरी करत नसाल तेव्हा अंडरग्राऊंड व्हावं, असं करु नये, एक खेळाडू म्हणून तुम्ही असं करु नये, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात श्रीलंकेला टी 20 मालिकेत पराभूत करण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल.