In Pics: पहिल्या कसोटी भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, एक डाव 222 धावांनी सामना घातला खिशात
भारत आणि श्रीलंका यांच्यात मोहालीत पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं एक डाव आणि 222 धावांनी हा सामना खिशात घातला आहे.
हा सामना विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना होता, पण तो केवळ 45 धावाच करु शकला.
रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिली कसोटी जिंकली असून सर्व स्तरातू त्याचं कौतुुक होत आहे.
पण सामन्याचा खरा हिरो ठरला रवींद्र जाडेजा. त्याने एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वच खेळाडूंची अप्रतिम कामगिरी या सामन्यात पाहायला मिळाली.
सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. ज्यानंतर जाडेजाच्या नाबाद 175 आणि पंतच्या 96 धावांच्या जोरावर भारताने 574 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. .
ज्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेला पहिल्या डावात 174 धावांवर सर्वबाद केलं.
त्यानंतर श्रीलंकेला फॉलोऑन मिळाल्याने श्रीलंकेने दुसरा डाव सुरु केला. ज्यात 178 धावांवर श्रीलंका पुन्हा सर्वबाद झाली. ज्यामुळे भारताने एक डाव आणि 222 धावांनी सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
यावेळी जाडेजाच्या जोडीला फिरकीपटू आश्विनने देखील उत्तम कामगिरी केली.